top of page

मसूरी, उत्तराखंड - (भाग पहिला)

नवीन ठिकाणी प्रवास करणे ही अशी एक इच्छा किंवा आवड आहे जी कधीच पूर्ण होऊ शकत नाही. हाडाचा traveller क्वचितच म्हणेल माझ आयुष्यात भरपूर फिरून झाल आहे आणि यापुढे मी फिरणार नाही. इंग्रजीत एक म्हण आहे "more you know the less you know" तसंच फिरण्यातही आहे. विशेषतः भारतासारख्या मोठया देशामध्ये इतकी विविधता असून पूर्ण देश पालथा घालण्यात एक पूर्ण आयुष्यही लागू शकत.

नोव्हेंबर 2021 मध्ये पहिल्यांदा मी उत्तर भारतात प्रवास केला. तेव्हा हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू हे राज्य बघितले. दिल्ली ते पंजाब प्रवासात आम्ही उत्तराखंडच्या अगदी जवळून गेलो होतो तेव्हाच पुढच्या खेपेला उत्तराखंडला नक्की येऊ असा विचार येऊन गेलेला.


तेव्हा येऊन गेलेला विचार प्रत्येक्षात अमलात आला एप्रिल 2022. जेव्हा मी trip plan करत होतो तेव्हा दोन पर्याय होते पहिला पर्याय म्हणजे लेह लडाख आणि दुसरा म्हणजे उत्तराखंड. लेह लडाखला बुलेटने फिरावं ही बहुतेक मुलांची

इच्छा असते तशीच माझीही होती पण लेह लडाख बद्दल

माहिती घेतांना समजलं एप्रिलमध्ये लेह फिरण्यासाठी अनुकूल नसत. नुकताच बर्फ पडून गेला असल्याने अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद असतात. लेह लडाख हे जून ते सप्टेंबर मध्ये फिरायला अनुकूल असते आणि अनेक bike trips तेव्हाच आयोजित केल्या जातात. हे सर्व


लक्षात घेवून मी लेह लडाखचा plan postpone करून एप्रिलमध्ये उत्तराखंडमध्ये जाण्याच ठरवलं. उत्तराखंड येथे बघण्यासाठी बरेच ठिकाण असून खासकरून हिंदू धर्मातील पवित्र स्थळे उत्तराखंडमध्ये भरपूर आहे. मसुरी, ऋषिकेश, हरिद्वार, नैनिताल, बद्रीनाथ, केदारनाथ अशी अनेक ठिकाणी पर्यटक फिरू शकतो. मी 7-8 दिवसासाठीच जाणार असल्याने मला सर्व ठिकाणी जाणे शक्य न्हवते म्हणून मी देहराडून, मसूरी, ऋषिकेश, हरिद्वार ठिकाणी जायचं ठरवलं. मला प्रवासात थोड late back राहायला आवडत. जोपर्यंत

नवीन ठिकाणी रस्ते पाठ होत नाही किंवा दुकानदाराशी ओळख होत नाही तो पर्यंत तिथून निघणे मला जड जात.


ठरल्याप्रमाणे मी 8 एप्रिलला पुण्यावरून निघालो आणि 9 एप्रिलला डेहराडूनला पोहचलो. उत्तराखंड trip बद्दल एक खास गोष्ट म्हणजे मी उत्तराखंडमध्ये मी पहिल्यांच जात असल्याने तेथे प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी नवीनच होती.


डेहराडून उत्तराखंडची राजधानी असून ते प्रसिध्द आहे Indian Military Academy (IMA) आणि Doon University साठी. IMA प्रमाणे अनेक Indian military च्या अनेक संस्था डेहराडूनमध्ये आहे. मसूरी डेहराडून पासून 40 km लांब आहे. मसूरीला पोहचायला साधारणता दोन पर्याय आहे एक तर थेट तुम्ही private cab करू शकता किंवा public transport चा वापर करू शकता. अश्या परिस्थितीत बहुतेकवेळा मी public transport निवडतो कारण त्याने शहरांची जवळून ओळख होते आणि त्यापेक्षा महत्वाच म्हणजे त्याने पैसे पण बरेच वाचतात.


मसूरी हे एक Hill station असून १८२५ मध्ये ब्रिटिश काळात ते वसवल गेल. ब्रिटिश लोकांनी त्त्यांचे सोयीसाठी अनेक boarding school ही इथे सुरु केल्या त्यासाठीही मसूरी प्रसिध्द आहे जसे Jesus and Mary, Waverly (1845), St. George's College (1853), Woodstock School (1854), Oak Grove School (1888), Wynberg-Allen (1888), Guru Nanak Fifth Centenary (1969). मसूरी प्रसिध्द असण्याचं अजुन एक कारण म्हणजे UPSC पास झालेल्या भावी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण केंद्र Lal Bahadur Shastri National Academy of Administration मसूरीमध्ये आहे.

मला मसूरीबद्दल आकर्षण असण्याच एक व्यक्तीगत कारणही आहे ते म्हणजे लेखक Ruskin Bond यांच. मसूरी, लांडोर, डेहराडून इथे पहिल्यांदा जरी जात असलो तरी पहिले अनेकदा Ruskin Bond याच्या लेखानातून अनेकदा अनुभवल आहे. Ruskin Bond म्हणजे माझे आवडते इंग्लिश लेखक. त्यांचा जन्म मसूरी मधेच झाला अजुनही ते मसूरीमध्ये राहतात. त्यांच्या बद्दल एक खास गोष्ट म्हणजे त्यांचे मसूरीच्या mall road वर स्वतःच्या मालकीचे Cambridge bookstore असून प्रत्येक ते शनिवारी 3:30 ते 4:30 येथे येतात आणि त्यांना भेटायला आलेल्यांना भेटतात. त्यामुळे शनिवारी दुपारी त्यांच्या दुकानावर पोहचणं हे माझ्या plan मध्ये होतच.


डेहराडून वरून निघाल्यावर दुपारी 1 वाजता मी मसूरीमध्ये उतरलो. Library road जवळ माझ्या राहण्याची सोय असल्याने mall road वरून तिथंपर्यंत पायी जातांना डोंगराच्या कुशीत वसलेल मसूरी दिसत होत. काही ठिकाणी boarding school चे मैदान दिसत होते. Momos, Maggi यांचे सरसकट दुकाने दिसत होती. काही वेळात मी माझ्या GoStop hostel वर पोहचलो. काल रात्री पासून थेट प्रवास चालू असल्याने आणि 3:30 ला Cambridge Bookstore जायच म्हणून थोडा आराम करण्यासाठी पडलो.


उर्वरित सफर भाग दोन मध्ये ..85 views2 comments

Recent Posts

See All
Post: Blog2_Post
bottom of page