top of page

लेह लडाख - भाग तीन


ree

आज पासून लेहचा दुसरा आणि सर्वात महत्वाचा टप्पा सुरु झाला. यामध्ये मी पहिलेच ठरवलेल्या प्रमाणे online book केलेला  Bike group join केला. यापुढे मी ४ दिवस लेह, नुब्रा valley, दिस्कीत, pengong lake आणि परत लेह असा प्रवास करणार होतो. आज आमचा लेह कॅम्प वरचा पहिला दिवस होता, तिथे ग्रुपमधील इतरांशी ओळख झाली. Group मध्ये १६ लोक होती आणि देशातील अनेक भागातून लेहला आलेली. माझा जरी लेह मध्ये दुसरा दिवस असला तरी ग्रुप मधील अनेकांचा पहिलाच दिवस असल्याने आज कुठेही प्रवास होणार न्हवता. उद्यापासून riding साठी लागणाऱ्या हिमालयन गाड्या आणि riding gears पण आम्हाला देण्यात आले. 


दुसऱ्या दिवशी आम्ही लेह जवळील झंस्कार valley पर्यंत जावून परत लेहला परत आलो. माझे हे सर्व ठिकाणे पाहून झाली असली तरी revision करायला काही हरकत नाही. कारण परत लेहला कधी प्रवास होईल हे माहिती नाही. त्यामुळे जितकं फिरायचं आताच फिरून घेयच.


पुढील दिवशी सकाळी आमची खरी riding सुरु झाली. आज आम्ही ३ दिवसाचा सामान घेऊन नुब्रा valley ला निघालो. नुब्रा लेहपासून साधारणतः १७० किमी आहे. ते लेहपेक्षा अधिक थंड आहे. १७० किमी प्रवास करण्यासाठी आम्हाला पूर्ण दिवस लागणार होता त्यामुळे ग्रुप कॅप्टनने दिलेल्या सूचनांचे पालन करत त्याच्या मागे गाडी चालवत सर्व निघालो . नुब्राला जातांना "खारडुंगला pass" वर आम्ही थांबलो . खारडुंगला पासचे वैशिट्य म्हणजे  हा रस्ता भारतातील सर्वात उंचावरील motor-able रोड म्हणून विख्यात आहे. अपेक्षेप्रमाणे इथे वातावरण खूप थंड होते आणि बर्फाचा थर डोंगरावर आणि रस्त्यावर साचला होता. 

ree

खारडुंगला पास नंतर आम्ही riding करत नुब्राला निघालो. इथे रस्ता भरपूर छोटा असल्याने आणि slippery असल्याने प्रवासाला वेळ लागत होता. दुपारी २ च्या सुमारास आम्ही Diskit monastery ला पोहचलो. Diskit monastery म्हणजे एक आश्चर्यच आहे.  इतक्या remote ठिकाणी इतकी बलाढ्य बुद्धाची मूर्ती आणि डोंगरावर वसलेली monastery म्हणजे नवलच आहे. वरती नीलगार आकाश अगदी डोक्यावरच आलं आहे असंच इथे फिरतांना जाणवत. Diskit monastery ही नुब्रा valley मधेच येते, त्यामुळे आम्ही  Diskit monastery पाहून आम्ही नुब्रा मधील आमच्या राहण्याचा ठिकाणी निघालो.  त्याआधी dunes valley जिथे पांढरी मातीचा सपाट मैदान आहे तिथे जाऊन आलो. इथे खासकरून पर्यटकांची गर्दी होती, इथे पहिल्यांदा मी लडाखी उंट पाहिले. ते झाल्यावर आम्ही nubra valley मधील आम्ही आमच्या राहण्याच्या ठिकाणी येऊन पोहचलो. जिथे आमचा मुक्काम होता त्याच्या समोरच मिलिटरीचा compound होता. चीन बॉर्डर इथून जवळ असल्याने इथे मिलिटरी base, सैनिक आणि त्यांच्या गाड्या आता जास्त प्रमाणात दिसायला लागल्या होत्या. 


आज आम्ही सकाळ पासून १७०-१८० किमीचा प्रवास केला होता. रस्ताही खराब असल्याने आम्हला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. इतका प्रवास झाल्याने आणि उद्याही pengong lake चा प्रवास असल्याने सर्व recovery mode मध्ये गेले आणि तो दिवसही लवकर संपला 

Comments


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

  • LinkedIn
  • Facebook

©2021 by Vandan Pawar. Proudly created with Wix.com

bottom of page