top of page

लेह लडाख - भाग दुसरा

लेह मधील पहिला दिवस इथल्या वातावरणाशी adjust करण्यातच गेला. आज दुसऱ्या दिवशी त्यामानाने बरं वाटले. 

दुसरा दिवस इथे माझा आज मोकळा होता. माझी bike tour उद्या पासून सुरु होणार असल्याने मी आज लेह जवळपासच फिरायचे ठरवले.

हॉस्टेलमध्ये मला एक मित्र भेटला त्याच्या बरोबर जावून आम्ही एक bike भाड्याने घेतली आणि फिरायला निघालो.


लेह जवळच Zanskar valley म्हणून एक ठिकाण आहे तिथे आम्ही जायचे ठरवले. Zanskar हे कारगिल region मध्ये येते आणि वाटेत २-३ अजून पाहण्यासारखी ठिकाणे असल्याने आम्ही zanskar कडे निघालो.  Google map वर बघत बघत लेहच्या बाहेर निघालो आणि खरी गंमत सुरु झाली. आजकाल लेह लडाखच्या असंख्य रील्स दिसतात त्यामध्ये जो काही देखावा दिसतो तो आम्ही अनुभवत होतो. रस्ता सोडला तर आजूबाजूला मोकळी जागा, उंच उंच डोंगर, ठरावीक वेळानंतर मिलिटरी ट्रक किंवा कॅम्प आणि थंड हवा अनुभवत आमचा प्रवास सुरु होता. लेह शहर मागे राहिले आणि आमचा वेग वाढला. रस्ते चांगले असल्याने गाड्या जोरजोरात पळत होत्या. Zanskar valley जातांना आम्ही पहिला स्टॉप घेतला तो गुरुद्वारा पत्थर साहिब येथे. हा गुरुद्वारा इंडियन मिलिटरी द्वारे सांभाळला जातो आणि लेहला प्रत्येक पर्यटक इथे नक्की येतो. गुरुद्वारामध्ये दर्शन घेवून आम्ही पुढे निघालो. आता तर रस्त्यावरची गर्दी आणखीच कमी झाली. Zanskar valley वरती असल्याने आम्ही घाट चढायला सुरवात केली. एकाबाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला थोडाफार बर्फ बघत घाट जात होता. याठिकाणी पर्यटकांची संख्या जास्त असल्याने ठिकठिकणी रस्त्यालगत मॅग्गी, चहा ची स्टॉल्स भरपूर आहे. एक दिड तासाच्या प्रवासानंतर आम्ही Zanskar च्या वरच्या पॉइंटला पोहचलो.


Zanskar ला जायला आम्हाला घाट उतरून खाली जायचे होते पण त्याआधी वरतून ते खूप मस्त होते. Zanskar संगम मध्ये Indus river (सिंधू नदी) आणि Zanskar नदीचा संगम असल्याने दोन प्रवाह एकत्र येवून मिळतात हे इथे बघायला मिळते. आम्ही उतरून प्रत्यक्ष संगमावर गेलो तिथे थोडा वेळ थांबलो. तिथे बाजूला इंडियन मिलिटरी चा कॅम्पही होता आणि त्यांची एक boat ही होती. Zanskar वर river राफ्टिंग होती पण नदीचं पाणी खूप थंड असल्याने कोणीच rafting करण्याची हिंमत करत न्हवते.



Zanskar संगम नंतर अगदी थोड्या अंतरावर एक प्रसिद्ध Monestry होती तिथे आम्ही निघालो. वाटेत एक छोटं गाव लागले आणि गावाच्या शेवटी नदी काठी Monestry होती. तिकीट वैगरे काढून आम्ही आत गेलो. तिथे बुद्धाच्या अनेक लहान मोठया मुर्ती आणि अनेक वेगवेगळ्या गोष्टी होत्या. तिथे एक भिक्षु सर्व पर्यटकांना माहितीही देत होता. यामध्ये एक वेगळी गोष्ट ऐकायला भेटली म्हणजे त्यांच्या नुसार लेह लडाख मध्ये अजूनही दुर्मिळ गोष्टी टिकून आहे कारण लेह लडाख अजून पूर्णपणे commercialized झालं नाही. इथे पोहचायला लागणार वेळ असो किंवा इथले वातावरण त्यामुळे मोजकेच पर्यटक इथे येतात. त्यामुळे इथली मूळ संस्कृती इथे टिकून आहे. 


तिथेच थोडा वेळ घालवून आम्ही परत निघालो. जसा जसा दिवस मावळत होता थंडी वाढत होती. त्यामुळे आम्हाला लेहला अंधार होण्याआधी पोहचायचे होते. 2 तासाच्या प्रवासानंतर परत हॉस्टेल वर आलो. आजच्या दिवसाचा पूर्ण झाला असल्याने आता आरामच होता. 


उद्यापासून माझी bike trip सुरु होणार असल्याने आज थोडीफार पॅकिंग ही करायची होती. 

20 views0 comments

Recent Posts

See All
Post: Blog2_Post
bottom of page