top of page

The Show Must Go On

Updated: May 22, 2021

सध्या कोरोनामुळे चहुबाजुला भयग्रस्त आणि नकारात्मक वातावरण आहे, पण यातुन काही बोध घेवून आणि किंचित दृष्टिकोण बदलून सकारात्मक विचार करणेही तेवढेच आवश्यक आहे.


राज कपूर म्हणायचा "The Show Must Go On" त्याचप्रमाणे आपलेला या संकटचे पलिकडे जावून पुढे पाहणं महत्वाचे बनलं आहे.


कोरोनाने जरी जगाची बरीच वाताहत केली असली तरी तो विषाणूने कळत-नकळत समाजात बरेच बदल घडवून आणलेत. त्यामधे काही बदल चांगलेही आहे.

तर आज मी कोरोनामुळे झालेले फायदे किंवा सकारात्मक बदल यांची यादी बनवली आहे.


१. आरोग्यम धनसंपदा: आरोग्यची काळजी घेणं म्हणजे काही १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीचा समारंभ नसुन की जो वर्षातून एक दिवस साजरा झाला की आपल काम झाल. तर आरोग्यावर तुम्हाला नियमितपणे काम कराव लागत, वेळोवेळी तपासणी करावी लागते, व्यायामाला वेळ द्यावा लागतो. रोगप्रतिकार शक्तीच महत्व सर्वाना समजलंच असेल. सावधानता ही उपचार करण्यापेक्षा नेहमीच चांगली आहे. त्यामुळे सर्वानी यातून धडा घेऊन आपली आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेतीलच अशी आशा करुया.


२. पैशाची बचत: सिनेमा मधे अनेकदा एक वाक्य ऐकलं असेल "पैसा हाथ का मैल होता है", पण कोरोनाने ह्या वाक्याला अगदी फाट्यावर मारल. महामारी मधे अनेक उद्योगधंदे बंद पडले, नोकरे गेल्या, पगार कपात झाली. जर तुम्ही यापैकी नसाल तर स्वतःला भाग्यवान समजा. ह्या कठीण स्वतःला एकीकडे कमाईच साधन नसताना, काहींचा हॉस्पिटलचा खर्च वाढला. अशा परिशितीत ज्या पैसे वाचवून ठेवले होते तेच कामात आले. कदचित ह्याच परिस्थितीसाठी थोडा पैसा तरी हाताशी नेहमी ठेवावा म्हणून जुने लोक बचत करण्याचा सल्ला देतात. खास करुन तरुण मुलांनी यातुन पैसा बचतीचे महत्व समजुन घेयला हवे .


3. आरोग्य विम्याचं महत्व: कोरोनामुळे अनेकांना आरोग्य विम्याचं महत्व पटलं. आरोग्य विमा हे डोक्यावर हेल्मेट घालण्या सारखे आहे, कधी गरज लागेल सांगता येत नाही. पण गरजेला आरोग्य विमा अणि हेल्मेट दोघही हवेच. अजुनही लोकांमध्ये आरोग्य विमा याबदल उदासीनता दिसून येते अगदी शहरात सुद्धा. यामधे सरकार आणि विमा कंपनी यांनी मिळुन लोकांमध्ये आरोग्य विमा याबदल जनजागृती करावी, सवलती देव्या. अगदी त्यासाठी गरज लागलीच तर कायदा ही करावा. खासगी कंपनी यांनी त्याचे कर्मचाऱ्यांना विमा काढून द्यावा. कारण आरोग्य विमा आजकल असणं गरजेच आहे.


४. घरी बसुन काम: घरी बसुन काम करणही संस्कृती कोरोना मुळे भारतातही रुजली आणि कदाचित यशस्वी पण झाली. यामुळे बरेच चांगले बदल दिसता आहे. अगदी छोट्या गावातून मंडळी नोकरी वर रुजू होता आहे. त्यामुळे जॉब लोकेशन चा अडथळा बाजूला झाला. त्यामूळे शहरात रहण्याच खर्च कमी झाला आणि पैशेच विकेंद्रीकन झालं. हे आपले ग्रामीण अर्थव्यवस्था साठी लाभदायक आहे. घरी बसुन काम होवू लागलेने काही कंपनीचे फायदे पण झाले. कार्यालय वर खर्च होणारे लाखो रुपये वाचले. शहरांच म्हणायचं झाल तर त्याचेवरचा अतिलोकसंख्येचा भार आणि रहदारीचा प्रश्न बरेच प्रमाणात कमी होइल.


५. घरी बसुन शिक्षण: 4-5 वर्षापुर्वी idea ची एक जाहिरात बघितली होती ज्यामधे ऑनलाइन शिक्षणामुळे अगदी छोटे गावापर्यंत शिक्षण जाऊन पोहचत अस दाखवण्यात आल होता. कोरोनामुळे हे आता सहज शक्य झाल आहे. विद्याथी घरी बसुन शिक्षण घेत आहे. परीक्षेबाबतीत अजूनही घोळ आहे पण अपेक्षा आहे की ते लवकरच सुटतील. अजुनही ऑनलाइन शिक्षण पध्तीत सुधारन्यास भरपूर वाव आहे, त्यानूसार तंत्रण्यानामध्ये ही अजून आवश्यक बदल घडवून आणता येइल.


६. आरोग्य विभागाचं आधुनिकीकरण : एक गोष्ट नक्की आहे आपलेला आरोग्य व्यवस्थेवर अगदी खोलवर जाऊन सुधारणा करणे जरुरी आहे . तसे बदल हळू हळू दिसायलाही लागले आहे . भारताने वार्षिक जीडीपीमधे आरोग्य विभागावर १% व जास्तीत जास्त १.२८% इतकाच खर्च गेल्या सहा व सात वर्षात  केला आहे. अपेक्षा करूया यातून सर्व सरकारांनी धडा घेऊन बदल घडवणे गरजेचं आहे . आरोग्य व्यवस्थेसाठी लागणारे वैद्यकीय यंत्र आणि तंत्रण्यान जर देशातच बनवले तर रोजगार निर्मितीही होईल.


 


10 views0 comments

Recent Posts

See All
Post: Blog2_Post
bottom of page