top of page

Goodbye 2022


२०२३ सुरु होवून दोन आठवड्यापेक्षा जास्त वेळ झाला. प्रत्येक वेळी नवीन वर्ष आपल्या बरोबर अनेक नवीन गोष्टी घेऊन येतात.


हे सर्व असताना मागील वर्षाचा लेखाजोखा मांडण हेही गरजेच आहे. मागील वर्षी अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडून गेल्या, अनेक नवीन अनुभव येवून गेले परंतु काळाच्या ओघात हे सर्व अनुभव फिकट पडले. म्हणूनच या छोट्या लेखाद्वाऱ्या मागील वर्षी घडलेले काही ठळक प्रसंग एकदा आठवून बघूया.


नोकरी बदल: २०२२ च्या अखेरीस मी नोकरी बदलली. 3 वर्षाच्या काम केल्यानंतर मी मागील कंपनी सोडून नवीन कंपनी जॉईन केली. माझी सध्याची कंपनी ही बहुराष्ट्रीय असून ही माझी पहिलीच कंपनी असून जी बहूराष्ट्रीय आहे. यापूर्वी मी mostly small scale किंवा medium scale कंपनीमध्येच काम केले असल्याने सध्याचा अनुभव वेगळा आहे. MNC कंपन्यांचा ढाचा किंवा सिस्टिम मोठी असल्याने त्यांचा turn around time छोट्या कंपन्यापेक्षा खूपच जास्त असतो हे मला प्रकर्षाने जाणवले.


उत्तराखंड आणि कर्नाटक visit: २०२२ मध्ये माझे देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेले उत्तराखंड आणि कर्नाटक हे दोन नवीन राज्य पाहून झाले. उत्तराखंड मध्ये डेहराडून, प्रसिद्ध hill स्टेशन असलेले आणि अजूनही ब्रिटिश छाप असलेले मसूरी, जागतिक yoga capital म्हणून प्रसिद्ध असलेले ऋषिकेश यांची भ्रमंती झाली. तसेच UNESCO World Heritage Site म्हणून प्रसिद्ध असलेले कर्नाटक मधील हंपी देखील बघितले. दोन्हीही प्रवासात अनेक नवीन गोष्टी पाहिल्या आणि अनुभवल्या, त्याचमुळे travel wise २०२२ वर्ष माझ्यासाठी एकदंरीत चांगले गेले.


अभयारण्य: २०२२ मध्ये मी वाचलेल्या पुस्तकांमध्ये मला सर्वात जास्त आवडलेले पुस्तक आहे जयंत नारळीकर यांचे अभयारण्य. 2 तासात वाचून होणाऱ्या या पुस्तकात science, technology आणि काही fictional characters यांचा मेळ साधून रंजक लघुकथा सांगितल्या आहेत. मुळात काही गोष्टींमधून भविष्यात माणूस technology च्या बळावर कुठपर्यंत मजल मारू शकतो याची कल्पना येते. ज्यांना marvel सारखे sci-fi सिनेमा पाहण्याची आवड आहे त्यांना हे पुस्तक नक्की आवडेल.


व्यायाम: २०२२ वर्षाच्या शेवटी काही तरी नवीन प्रयोग म्हणून मी जिम लावली. तसा निर्णय धाडसी होता पण एकदा प्रयत्न करून बघू म्हंटल. यापूर्वी मी एकदा काही दिवसांसाठी जिम लावली होती परंतु व्यायामाची सवय लागली नाही. परंतु यंदा जिम किंवा exercise चा अनुभव थोडा वेगळा आहे, प्रत्येक exercise मागे असलेले science आणि बारकावे यंदा मी समजून घेतोय. बघू भविष्यात कस जमतंय! बाकी शरीरात काही फरक होवो किंवा न होवो त्यावर मी एखादा लेख लिहिलं.


Blog ची वाटचाल: vandanpawar.com या ब्लॉगची सुरवातही मी २०२१ मधेच केलेली. एका रात्रीत Blog सुरु करतांना मला अपेक्षा न्हवती की तो इतका काळ टिकेल पण तो टिकला आणि वाढला. २०२२ मध्ये मी तब्बल १२ article's पोस्ट केले, तशी मला अपेक्षा १२ पेक्षा अधिक article पोस्ट करण्याची होती परंतु ते होवू शकले नाही. तरी आता नवीन वर्षात Blog वर जास्तीत जास्त article पोस्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील.


याव्यतिरिक्त अनेक गोष्टी २०२२ मध्ये घडल्या त्यातल्या काही चांगल्या होत्या काही वाईट. त्या सर्वंच गोष्टी इथे सांगायला नको, काहीतरी suspense हवा माणसाच्या आयुष्यात.


मागील वर्षापासून चांगले वाईट अनुभव घेऊन नवीन वर्षात मनसोक्त जगूया. तसेच सर्वांना नवीन वर्ष सर्वांसाठी सुखमय राहो म्हणून देवा चरणी इच्छा.

23 views0 comments

Recent Posts

See All

Comments


Post: Blog2_Post
bottom of page