top of page

Shivaji Maharaj And Start-up

आजकाल online shopping क्षेत्रामध्ये Flipkart आणि Amazon ह्या companies अग्रगण्य आहे. ह्या कंपन्या किती बलाढ्य आहे यांची कल्पना सर्वांना असेलच.


जर आज तुम्हाला एक सोळा वर्षाचा एक मुलगा भेटला आणि म्हणाला मी माझ्या मित्राबरोबर एक start-up सुरु करणार आहे जी पुढे जाऊन Flipkart आणि Amazon सारख्या मातब्बरांना तगड आव्हान देईल हे ऐकून तुम्हाला काय वाटेल? आपण नक्कीच त्या लहान मुलाला गंभीरपणे घेणार नाही किंवा त्याची दखलही घेणार नाही. पण तोच मुलगा १०-१५ वर्षांनंतर त्याच्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च ठिकाणी पोहचला तर त्यापेक्षा प्रेरणादायी प्रवास आपलेला कुठेच भेटणार नाही.


माझ्यासाठी हा लहान मुलगा म्हणजे शिवाजी महाराज, त्यांच start-up म्हणजे मराठा साम्राज्य आणि त्यांचे विरोधक म्हणजे मुघल, निजाम, पोर्तुगीज.

ज्या दिवशी शिवाजी महाराजांनी १६ वर्षांचे असतांना तोरणा जिंकून स्वराज्यच पताका बांधला तोपर्यंत ही start-up किती लांब पर्यंत जाईल याचा अंदाज कोणालाही न्हवता. पण फक्त कर्तृत्व, अथक मेहनत आणि बुद्धीच्या जोरावर महाराजांनी साम्राज्य फक्त घडवले नसून वाढवलेही. यामध्ये जिजामाता आणि मावळ्यांचाही महत्वाचा वाटा होता हेही तितकंच खरं.


आपल्या पुस्तकी इतिहासाची एक वाईट गोष्ट म्हणजे तिथे शिवाजी महाराजांना फक्त योद्धा म्हणून शिकवलं जात पण त्या पलीकडे जाऊनही महाराजांच्या अनेक पैलू असून ज्यावरही प्रकाश टाकणं गरजेचं आहे.


त्यामुळे शिवाजी महाराजांकडून प्रवासातून मला ज्याकाही गोष्टी शिकण्यासारखे वाटल्या त्या इथे मी मांडतो आहे.


१. माणसांची पारख:- शिवाजी महाराजांनी मोजक्याच मावळे निवडून राज्य चालवलं पण ते मोजके मावळे राजांचे कान, डोळे होते. अनेक मावळ्यांनी स्वतःच्या जोरावर अनेक मोहिमा यशस्वी करून दाखवल्या किंवा ते स्वराज्यसाठीं कोणताही त्याग करण्यास तत्पर होते.


२. अथक मेहनत:- राजांनी स्वराज्यसाठी अथक मेहनत घेतली. तस पाहिलं तर ते एका सधन कुटुंबातून आले होते वाटलं असत तर त्यांनी सुखात आणि ऐषोआरामात आयुष्य काढलं असतं पण त्यांनी अवधड पर्याय निवडला. जिथे त्यांना शून्यापासून सुरवात करून अथक मेहनत करावी लागली. एकदा यश मिळणे वेगळे आणि ते टिकवणे वेगळे त्याला मेहनती शिवाय पर्याय नाही.


३. बदल स्वीकारणे:- अनेक प्रसंगी राजांची पीछेहाट झाली पण त्यांनी स्वतःमध्ये योग्य ते बदल घडवून परत एकदा उसळी मारली. पुरंदरचा तह यामध्ये असच काही झाल होतं ज्यामध्ये राजांना २३ किल्ले मोगलांना द्यावे लागले होते. इतका तळ पाहूनही महाराजांनी पुन्हा राज्याला सावरलं आणि परत एकदा नवीन सुरवात होती. प्रत्येकाच्या आयुश्यात अनेक प्रसंग येतात जेव्हा जिंकता येत नाही पण तो शेवट नक्कीच नसलो.


४. भविष्यवेधी:- राजे यशस्वी होण्यामागे एक महत्वाचं कारण म्हणजे त्यांना भविष्याची समझ होती. राज्य पोर्तुगीजां आणि मुगलांपासून सुरक्षित ठेवायचं असेल तर आरमार उभारणं गरजेचं आहे हे त्यांना खूप लवकर समजलं होतं. त्याचमुळे त्यांनी सिंघूदुर्ग हा जलदुर्ग बांधला.


५. मर्यादा पुरुषोत्तम:- शिवाजी राज्यांनी इतर राजाप्रमाणे कधीही युद्धकैदी वर जुलूम केला नाही. युद्धकैदीमध्ये जरीही स्रिया असल्या तरीही त्यांवर कोणाकडूनही अत्याचार होणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली. हा जो पायंडा त्यांनी घालून दिला तो सध्यस्थितीत तसाच सुरु असायला हवा. महाराजांनी कधीच कोणावर जुलूम केला नाही पण त्यांनी गरज पडल्यावर शत्रुंना माफही केलं नाही. कितीही विरोध झाला तरी त्यांनी योग्य ती शिक्षा देण्यासाठी कधी मागे हटले नाही.


नुकतीच शिवजयंती झाली त्यामुळे सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. महाराजांचे गुण अमलात आणले तर ते नक्कीच सर्वांच्या फायद्याचे आहे आणि महाराजांसाठीही परिपूर्ण श्रद्धांजली राहील.


26 views0 comments

Recent Posts

See All

Comments


Post: Blog2_Post
bottom of page