top of page

Goodbye 2021

२०२१ वर्षाची अखेर जवळ असून नवीन वर्ष अगदी दारावर येऊन थांबल आहे. प्रत्येक वेळी नवीन वर्ष आपल्या बरोबर अनेक नवीन गोष्टी घेऊन येत असते.

हे सर्व असताना मागील वर्षाचा लेखाजोखा मांडण हेही गरजेच. २०२१ मध्ये माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी घडून गेल्या ज्यानंतर त्या काळाच्या ओघात मागे पडल्या. म्हणूनच ह्या लेखाद्वारे २०२१ च्या काही ठळक प्रसंग एकदा आठवून बघूया.


1. कोरोना सावट: २०२१ सुरु होण्याआधी पासून कोरोनाकाळ सुरु असल्याने २०२१ ला कोरोना हा नवा नाही, पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जी वाताहत केली ती सर्वानी बघितली. कोरोनाच्या पहिल्या लाट्याचा झटका खूप भारतीयांना लागला न्हवता अथवा कोरोनाची धग जाणवली न्हवती. याउलट दुसऱ्या लाटेत सर्वांनीच तारांबळ उडालेली आरोग्य व्यवस्था, oxygen आणि medicine चा तुटवडा, नदीत फेकलेले प्रेतांचे ढीग सर्वानी पाहिले. अनेकांना आपल्या आप्तांनाही गमवावं लागल, तेव्हा समजत होत आयुष्य हे किती क्षणबंघूर आहे. कोरोनाबद्दलच सकारात्मक गोष्ट म्हणजे कोविड लसही ह्याच वर्षी बाजारात आली, म्हणूनच बऱ्याच गोष्टी आटोक्यात आल्या.


2. Financial planning: २०२१ वर्ष भरपूर लोकांसाठी यात मी पण येतो ज्यामध्ये "Financial planning" साठी महत्वाचं ठरल.  सुरवातीला तर "Financial planning" म्हणजे नक्की काय? "Financial planning" चे महत्व काय? याबद्दल अचूक माहिती मिळाली. कोरोना काळात अनेक लोकांनी गुंतवणूक, Insurance, "Financial planning" याकडे लक्ष घालायला सुरु केल आणि मी पण . आजकाल YouTube वर "Financial planning", गुंतवणूक किंवा इतर विषयावर माहिती देणारे अनेक चॅनेल आहे. तिथूनच मला हा विषय समजण्यासाठी मदत झाली. कोरोनामुळे का होईना मी "Financial planning" मध्ये थोडं लक्ष घातलं याच श्रेय मी कोरोनाच देतो.


3. IT: IT क्षेत्रात काम करणाऱ्यासाठी मागील 1 वर्ष सुगीचे गेले. कोरोनामुळे इतर उद्योगधंद्याच्या प्रगतीला break लागला असतांना IT चा आलेख मात्र वाढतच गेला. उलट IT क्षेत्रात मनुष्यबळाची कमतरता जाणवते आहे. २०२१ मध्ये IT मध्ये अनेक लोकांच्या पगारात भरगोस वाढ झाली त्यामुळे जर तुम्ही सध्या IT मध्ये काम करत असाल तर स्वतःला नशीबवान म्हणू शकतात.


4. Blog ची सुरवात: vandanpawar.com या ब्लॉगची सुरवातही मी 2021 मधेच केलेली. एका रात्रीत Blog सुरु करतांना मला अपेक्षा न्हवती की तो इतका काळ टिकेल पण तो टिकला. आता नवीन वर्षात Blog फक्त टिकवायचा नसून जास्तीत जास्त वाढवायचा आहे. Blog लिहीतांना थोडंफार वाचनपण वाढलं. एक नवीन गोष्ट म्हणजे सध्या वाचायला मी kindle वापरू लागलो आहे. पहिले मला ठामपणे वाटायचं मला kindle वर वाचायची मज्जा येणार नाही पण हे खोट ठरलं. भविष्यतही अपवाद सोडले तर मी kindle चा जास्त वापर करेल वाचायला.


5. गडकिल्ले भ्रमणती: २०२१ वर्ष माझ्या भटकंती साठी खूप happening ठरले. कदाचित पूर्ण आयुष्यात फिरलो नसेल ते फक्त २०२१ मध्ये फिरलो. पुणे जिल्ह्यामधील अनेक गडकिल्ले सर केले, ज्यामध्ये मला सर्वात जास्त आवडलेला किल्ला म्हणजे तोरणा आणि राजगड. सर्वात कष्ट देणारा किल्ला म्हणजे राजमाची कारण राजमाचीला जाणार रस्ता खूप बिकट आहे. याशिवाय गोवा, कोकण, दिल्ली, अमृतसर, हिमाचल प्रदेश आणि जम्मूला ही स्वारी जाऊन आली.


एकीकडे हे सर्व असतांना २०२१ मध्ये मी अनेक ups n downs बघितले आणि अनुभवले. माणूस पूर्ण down n out असेल तर परत एकदा वरती येण्यासाठी किती शक्ती लागते ते समजल. शेवटी "Life is not fair, get used to it" हेही तितकंच खर.


२०२१ मध्ये जे झालं ते त्यातून शिकून नवीन वर्षात पदार्पण करूया आणि नवीन वर्ष सर्वांसाठी सुखमय रहावे ही देवा चरणी इच्छा.26 views0 comments

Recent Posts

See All
Post: Blog2_Post
bottom of page