top of page

ऋषिकेश, उत्तराखंड - (भाग दुसरा)


पहिला भाग :- https://www.vandanpawar.com/post/ऋषिकेश-उत्तराखंड-भाग-पहिला


मागील भागात सांगितल्याप्रमाणे मसूरी ते ऋषिकेश या सात आठ तासाचा प्रवास भरपूर दमायचा झालेला त्यामुळे पहिल्या दिवशी मी फ़क्त लक्ष्मण झुलाच्या जवळपासच फिरलो. फिरतांना संध्यकाळी गर्दी बरीच होती आणि ठिकठिकाणी खाण्यापिण्याच्या दुकान, योगा अथवा meditation सेंटर होते.


दुसऱ्या दिवशी मी सकाळी River Rafting ला जाणार होतो त्यामुळे ऋषिकेश मधील पहिला दिवस लवकर संपवला. सकाळी लवकर उठून राफ्टिंगचा pickup point गाठला. त्यासाठी परत लक्ष्मण झुला ओलाडून दुसऱ्या बाजूला आलो.


River rafting बद्दल बोलायचं झालं तर भारतामध्ये ऋषिकेश हे Rafting साठी सुप्रसिध्द आहे. इथे भारताच्या अनेक भागातून पर्यटक इथे खास rafting करायलाच येतात. ज्यांना River rafting बद्दल माहिती नसेल त्यांच्यासाठी थोडक्यात सांगायचे झाले तर rafting मध्ये बोटीतून 6-8 लोकांना बसवून नदीच्या वाहत्या प्रवाहात घेऊन जातात आणि प्रवाहाचा फायदा घेवून आणि हाथातील पँडल मारत अंतर पार करायचं. या प्रवासात काही ठिकाणी नदीचा विशिष्ठ प्रवाह (रॅपिड) येतो त्यामधून बोट जातांना आडेवेडे घेते. अनेकदा या रॅपिड म्हणून बोट पलटूही शकते. परंतु ह्या रॅपिडमधून जाणे हेच rafting ची मज्जा आहे बाकी boating तर कुठेही होऊ शकते.


ऋषिकेशच्या प्रवाहात साधारण 8-13 रॅपिड्स आहे. प्रत्येक रॅपिड इंग्लिश नाव आहे. जेव्हा मी विचारलं इथे रॅपिडला इंग्लिश नाव कोणी दिलं तेव्हा समजल की इथे सर्वात पहिले एका इंग्लिश माणसाने rafting केली अथवा इथे rafting होवू शकते हे शोधले आणि त्यानेच या रॅपिडला नाव दिली. ज्या कोणी इंग्लिश माणसाने हा शोध लावला त्याचे धन्यवाद कारण त्यामुळे इथे हजारो रोजगार निर्माण झाले आहे. ऋषिकेशपासून वरती शिवपुरी म्हणून एक गाव असून तिथून rafting सुरु होते आणि ऋषिकेशच्या घाटावर येवून संपते.


राफ्टिंग बद्दल मी कितीही सांगितल तरी जो पर्यंत कोणी अनुभव घेत नाही तो पर्यंत मज्जा नाही.


साधारणता 1 तासाच्या चिकार अंगमेहनती नंतर आमची राफ्टिंग संपली. तो 1 तास माझ्या आयुष्यातील नक्कीच एक विलक्षण आठवण म्हणून आताही माझ्याकडे आहे. पुढच्या वेळी ऋषिकेशला येईल तेव्हा raftingसाठी सर्वात पहिले येईल असा विचार करून हॉस्टेलवर परतलो.


संध्यकाळी ऋषिकेशचे अजुन एक आकर्षण त्रिवेणी घाटावरील गंगा आरतीला गेलो. इथे तीन गंगा घाटावर आरती होते पाहिली त्रिवेणी घाट(इथे सर्वात जास्त गर्दी असते), दुसरी प्रत्यथ आणि तिसरी लक्ष्मण झुला जवळ होते. तिथे एकसंध 10 ते 15 पुजारी रोज गंगेची पूजा करतात आणि पर्यटाकाबरोबर स्थानिक मंडळीही भरपूर असतात. जर ऋषिकेशला तुमचे येणे झाले तर त्रिवेणी घाटावरील गंगा आरतीला नक्की जा.


आरती करून रात्री परत येताना ऋषिकेश शहरातून आलो कारण दुपारी ज्या रस्त्याने आलो तो रस्ता जंगलातून असल्याने रात्री बंद करतात. याकारणाने ऋषिकेश शहराचे दर्शन आले. धार्मिक परिसर सोडला तर हे एक आपल्या शहरांसारखेच होते. इथेकुठे आपण योगा कॅपिटल किंवा तीर्थक्षेत्रामध्ये आहे याचा लवलेशही न्हवता. पुण्यासारखीच ट्रॅफिककिंवा पुण्यापेक्षा थोडी कमी तसेच AIIMS ऋषिकेशही मला रस्त्यामध्ये दिसले.


राफ्टिंग आणि गंगा आरतीचा अनुभव घेवून तो दिवस तिथेच संपला.


दुसऱ्या दिवशी मी नीलकंठ मंदिराला निघालो. इथून ते 40 किमी असून जाण्याचा मार्ग डोंगरातून चढण आहे. नीलकंठ मंदिर प्रसिध्द आहे एका गोष्टीसाठी म्हणजे महादेवाने समुद्रमंथनातून जे विष बाहेर आलेले ते इथेच पिले होते असा समज आहे. एका बाजूला गंगेच पात्र आणि दुसरीकडे चढा डोंगर पार करत नीलकंठ मंदिरात पोहचलो. इथे खासकरून स्थानिक किंवा जवळपासाचेच लोक जास्त दिसले. मी दर्शन घेवून लगेच परत निघालो. येतांना घाटातून परत येतांना एक शाळकळी मुलगा आणि त्याचे वडील घाटामध्ये उभे होते. मला थांबावून त्यांनी मला त्यांच्या मुलाला 2 किमी दूर त्याची शाळा आहे तिथे सोडायची विनंती केली. मी एकटाच असल्याने त्याला रस्त्यामध्ये सोडलं. त्याच्या बोलण्यातून समजल त्यांची परीक्षा सुरु आहे आणि आज दुपारचा पेपर आहे. बहुतेक वेळा जातांना येतांना अशीच लिफ्ट मागून शाळा ते घर किंवा घर ते शाळा प्रवास करातात. पहाडी भागात हे तसे सामान्यच आहे. शहरी माणसाला गावाचं कौतुक असत आणि गावाकडील लोकांना शहराचं कौतुक असते.


संध्यकाळी मी लक्ष्मण झुला जवळील गंगा आरतीला गेलो. अगदी कालच्या त्रिवेणी घाटावरील आरती सारखीच होती, फरक इतकाच त्यामानाने इथे गर्दी कमी दिसली. कालची त्रिवेणीची आणि आजची लक्ष्मण झुला ची गंगा आरती मला भावुन गेली होती. त्यामुळे यापुढे जो पर्यंत ऋषिकेश मध्ये आहे तोपर्यंत दिवसा कुठेही फिरायलो जावो पण संध्यकाळी गंगाआरती साठी इथेच येयचे हे ठरवले आणि ऋषिकेश मधला माझा तिसरा दिवसा तिथेच संपला

17 views0 comments

Recent Posts

See All

Comentários


Post: Blog2_Post
bottom of page