आजकल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (समाज माध्यम) वापरण कोणासाठी नवीन नाही. बहुतेक लोकानी किमान एक तरी समाज माध्यम वापरल असेलच. माध्यम म्हणून हे सर्वाना व्यक्त होण्याची संधी देते अगदी जस वाटेल तस ज्याला आपण पुर्ण स्वातंत्र म्हणतो. त्यामूळे आपण सर्वानी स्वःताला भाग्यवान समजावं कारण मागील पिढीसाठी ही सोय न्हवती.
आजकल भारतात अनेक मंडळी IT क्षेत्रामधे काम करतात. त्यामुळे समाज माध्यम वापरण किंवा नवीन माध्यम बनवन हे नित्याचंच आहे. पण त्याच मूळ गाभा अजुनही खुप लोकांना समजू शकला नाही.
काहीसाठी समाज माध्यमे जीवनाचा प्रश्न सोडवतो उदा कलावंत, पत्रकार, लेखक. पत्रकारितेच उदाहरण घेतल तर आजकल आणि भूतकाळातही प्रत्येक सरकारने त्याचे विरोधात बोलू नये किवा टीका करु नये म्हणून मीडियावर आणि वर्तमानपत्रा वर नेहमी ताबा ठेवण्याचा पर्यन्त करते. चीन आणि उत्तर कोरिया याचे जिवंत उदाहरण आहे. आपले कडेही थोडे प्रमाणातही ही परिस्थिती दिसून येते. पत्रकारांना आपली काही प्रखर मते मांडू देत नाही. अश्या वेळी अनेक पत्रकारांनी आपले वर्तमानपत्र चालू करण्याचं प्रयन्त केला पण हे सर्वासाठी यशस्वी होईलच असे नाही. या प्रकारातल एक उदाहरण म्हणजे बाबा राम रहिम याचे सिरसा येथील आश्रमात होणारे गैरकृत्याबदल सर्व माहिती असूनही कोणी वाच्यता करत न्हवतं. तेव्हा राम चंदर छत्रपती या वर्तमानपत्र मालकाने आपले पत्रकात राम रहिमची सर्व गैरकृत्य छापली आणि जगा समोर सत्य बाहेर आणलं. पुढे त्याचा राम रहिमचे गुंडानी खून केला.
आजकल प्रत्येकाकडे Platform आहे. काही क्षणामध्ये तुम्ही हज़ोरो लोकपर्यंत आपले विचार घेवून पोहचु शकता. म्हणूनच कोणामधे प्रतिभा, कौशल्य असेल तो कोणाचीही मदत न घेता लोकांपर्यंत पोहचू शकतो आणि नावारूपाला येऊ शकतो. Tiktok हे याचे एक सर्वात उत्तम उदाहरण आहे. Tiktok मधून बरेच छोटे गावातून मुल मुली आपले कलेतून नावारुपाला आले जे की Tiktok शिवाय होण खुपच अवघड होत. कारण मोठे शहरामध्ये तुमचे कलेपेक्षा काहीवेळा इतर गोष्टीना ग्राह्य धरले जातात.
अगदी हे निर्भीड पत्रकारांसाठी पण लागू होत. मोठया मीडिया कंपनीमधे मोकळेपणाने काम करता येत नाही ही कल्पना सर्वांचा आहे. त्यामूळे अनेक असे पत्रकार Youtube, Twitter, Facebook असे platform वरुन काम पुढे चालवतात. यामधे कोणतीही गुंतवणूक न करता थेठ लोकांपर्यंत पोहचता येत. हाच समाज माध्यमाचं सर्वात मोठा फायदा आहे.
त्यामुळे माणसाची कल्पनाशक्ती आणि तंत्रण्यानाचे जोरावर जे Platform किंवा समाज माध्यम भेटली आहे त्याच जबाबदारीपूर्वक वापर करने सर्वानी आवश्यक आहे.
शेवटी जाताना Spiderman सिनेमा मधे एक छान वाक्य आहे "The Great power comes with great Responsibility" त्या समाजमाध्यम चे बाबतीतही लागू पडते .
Comments