नुकतच मी परीघ पुस्तक वाचल, त्यावर इथे मी माझे असलेले विचार थोडक्यात मांडत आहे.
पुस्तकाचे नाव :- परीघ
मूळ लेखिका :- सुधा मूर्ती
मराठी अनुवादक :- उमा कुलकर्णी
तुम्हीही परीघ नक्की वाचा तुम्हाला नक्की आवडेल..
प्रत्येकाच्या कानावर अनेक वेळा गोष्टी आल्या असतील की अमुक व्यक्ती गरीब होता तेव्हा खूप चांगला होता पण जेव्हा पासून श्रीमंत झाला तेव्हा तो खूप बदलला. अमुक व्यक्ती गरीब होता तेव्हा त्याला मोजकेच मित्र किंवा नातेवाईक होते पण श्रीमंत झाल्यापासून मित्रपरिवार भरपूर वाढला. पैसा माणसांमध्ये आणि आयुष्यामध्ये कसे बदल घडवून आणू शकतो याच अतिशय सुरेख चित्र रेखाटलं आहे सुधा मूर्ती यांनी परीघ या पुस्तकामध्ये.
परीघ पुस्तकाची मूळ लेखिका आहे सुधा मूर्ती. मी मराठी आवृत्ती वाचली त्याची लेखिका आहे उमा कुलकर्णी. मूर्ती यांची खासियत म्हणजे जगातील सर्वात अवघड विचार किंवा शिकवण गोष्टी रूपात सामावून सांगायची. कोणतीही शिकवण किंवा सल्ला थेट सांगण्यापेक्षा जर गोष्टी रूपात समजवून सांगितलं तर तो लवकर पोहचतो असे मला वाटते. त्याचमुळे आपले इथे लहान मुलांना गोष्टी सांगितल्या जातात ज्यामधून त्यांना काही गोष्टी शिकवल्याही जातात.
परीघ ही गोष्ट आहे मृदुला आणि संजयची. मृदुला एका छोट्या गावात पण काहीश्या सुखसंपन्न घरात वाढलेली मुलगी. दुसरीकडे संजयही लहान गावात जन्मलेला पण घरची परिस्थिती अतिशय बेताची. संजयचा एक हात छोटा असल्याने त्याच्या मनात निर्माण झालेला न्यूनगंड पण तो अभ्यासात प्रचंड हुशार आणि मेहनती. आर्थिक परिस्थिती चांगली नसूनही कष्ट करून तो पुढे डॉक्टर बनतो. संजय सुरवातीला आदर्शवादी असतो, आपण डॉक्टर फक्त गरीब लोकांची सेवा करायला बनलो आहे यावर त्याची ठाम समजूत असते. म्हणूनच तो खासगी हॉस्पिटलमध्ये काम न करता सरकारी हॉस्पिटल मध्ये काम करतो. तसे पाहिल तर त्याच्याकडे असलेले कामामधील कौशल्यावर त्याने खासगी हॉस्पिटल भरपूर पैसे कमवले असते पण संजयसाठी पैसे महत्वाचे न्हवते.
नोकरी करतांना प्रगती करण्यासाठी दुसऱयाला चिरडून किंवा फसवून जाण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही अशी मानणारी मंडळी संजयच्या आयुष्यात आली आणि यामध्ये संजयचा बळी जाऊ लागला. त्याच्या कामाचे श्रेय इतर लोक घेऊ लागले किंवा तो पात्र असूनही त्याला डावलून इतर डॉक्टरांना Scholership मिळू लागल्या कारण संजयकडे देयला पैसे किंवा मोठे political contacts न्हवते. आपली गरिबी आणि हाताचा न्यूनगंड बाळगलेला संजय हे सर्व निमूटपणे सहन करत राहिला. त्याच्या मनात एक विचार पक्का झाला तो म्हणजे "समाजात मानाचं स्थान मिळवायला पैसे असणे गरजेचं आहे आणि न्याय फक्त श्रीमंत लोकांना मिळतो इतरांना अन्याय सहन करावा लागतो"
दुसरीकडे मृदुलाही मोठी होऊन शिक्षिका बनते. ती काहीश्या सुखसंपन्न घरातून असल्याने तिच्या वाट्याला तो अन्याय किंवा गरिबी जी संजयने अनुभवली होती ते काही आल नाही. कदाचित त्यामुळे तिला पैश्याबद्दल जास्त आकर्षण न्हवत. जेव्हा मृदुला संजयला पहिल्यांदा भेटली तेव्हा तिला त्याचा आदर्शवादी आणि साधेपणा भावला. त्यामुळे जेव्हा संजयने तिला लग्नाचा प्रस्ताव पाठवला तेव्हा संजयच्या आर्थिक परिस्थितीचा किंवा इतर गोष्टीचा विचार न करता तो मान्य केला. लग्न होऊन दोघं बंगलोरला राहू लागले.
सरकारी हॉस्पिटलमध्ये खूप वर्ष अन्याय सहन केल्यावर एक दिवस संजयने त्याचा कॉलेजचा मित्र Alex बरोबर खासगी नर्सिंगहोम टाकायचा निर्णय घेतला. यामध्ये महत्वाची भूमिका निभावली ती मृदुलाने. मृदुलाकडे सरकारी नोकरी असल्याने जोपर्यंत संजयच्या नर्सिंगहोमचा जम बसत नाही तो पर्यंत तीने घराची जवाबदारी घेतली. ह्याचकारणांमुळे संजयनेही सरकारी नोकरी सोडून खासगी व्यवसाय करण्याची हिम्मत दाखवली. अभ्यासु आणि कष्ट घेणारा संजय अल्पवधीत नावाजलेला डॉक्टर बनला आणि त्याच्या नर्सिंगहोमला भरभराटीचे दिवस आले. एकवेळ स्कूटरवर फिरणारा संजय मर्सडीजमध्ये फिरू लागला. संजय भरपूर पैसा कमवू लागला आणि इथेच नवीन (किंवा खरा) संजय दिसू लागला. कधीकाळी गरीब रुग्णांची सेवा करता यावी म्हणून सरकारी नोकरी निवडणार संजय आता फक्त पैसे कमवायच्या मागे लागला. त्याच्या हॉस्पिटलची fees इतकी वाढली की गरीब रुग्ण तिथे येण अशक्य बनल. इतकी श्रीमंती येऊनही मृदुला मात्र तशीच राहिली. पैसा तिला बदलवू शकला नाही आणि ती तिच्या आदर्शवादी मूल्यावर ठाम राहिली.
संजय मात्र सर्व मार्गाने पैसा कमवू लागला. मग रुग्णांना अमुक कंपनीच औषध देयच म्हणून त्याच्याकडून येणारी लाचही भेटायला लागली. मग हा सर्व काळा पैसा लपवण्यासाठी केलेल्या चलाखी आल्या. मृदुलाला हे सर्व पटत नसल्याने संजय तिला अंधारात ठेवून पैश्याचे व्यवहार करू लागला. संजय त्याचा मुलगा शिशिर याला प्रेम, आपुलकी ह्या गोष्टी न शिकवता पैसेच महत्व, कोणतीही गोष्ट पैश्याने विकत घेता येते हे सर्व शिकवू लागला. अर्थात बदलेल्या संजयमुळे मृदुला आणि त्याच्यामध्ये खटके उडू लागले. संजय मृदुलाला प्रत्येक गोष्टीमध्ये ग्राह्य धरू लागला आणि मृदुला किती अव्यवहारिक आहे हे तिला प्रत्येक वेळी सांगू लागला. मला भेटलेल्या यशामध्ये फक्त माझाच वाटा आहे आणि मृदुलाशिवायही मी इतका यशस्वी बनलो असतो हे त्याला वाटू लागलं. अर्थात हा त्याचा अहंकार होता कारण मृदुलाने घराची जवाबदारी घेतली होती म्हणून संजय नर्सिंगहोम सुरु करू शकला.
एका दिवशी जेव्हा जेव्हा मृदुलाला संजयने तिला अंधारात ठेवून केलेले पैश्याचे व्यवहार समजले ती गोष्ट तिच्या खूप जिव्हारी लागली. मृदुलाला यामध्ये पैश्याचं महत्व न्हवत पण संजयने तिला अनेक वर्ष अंधारात ठेवून फसवलं हे तिला खूप लागलं. प्रत्येक गोष्ट पैश्याने विकत घेता येते हा संजयचा ठाम झालेला विश्वास, अहंकार ह्यामुळे मृदुला एक निर्णय घेते ज्यामध्ये ती लग्नाच्या २५ anniversary च्या कार्यक्रमापूर्वी संजय आणि घर सोडून आपल्या मूळ गावी परत येते आणि तिथे नोकरी करू लागते.
पुस्तकाचा शेवट मी काही इथे सांगत नाही त्यासाठी परीघ पूर्ण वाचा. पण पैसा माणसाला कसे बदलवू शकता हे संजय आणि मृदुला यांच्या गोष्टीतून नक्की समजते.
परीघमधील काही विचार मला खूप आवडले ते म्हणजे
"पैशा कंजूस माणसाला श्रीमंत झाल्यावर लोभी बनवतो",
"पैशा अधाशी माणसाला श्रीमंत झाल्यावर विलासी बनवतो",
"पैसा उदार माणसाला श्रीमंत झाल्यावर दानी बनवतो "
तस पैसा कमवणं काही वाईट नाही पण पैश्याबरोबर Humilty पण वाढली तर तो अजून उठून दिसतो ..
तुम्हीही परीघ नक्की वाचा तुम्हाला नक्की आवडेल....
Commentaires