top of page

सायकल

Writer: Vandan PawarVandan Pawar

२०१७ साली "सायकल" नावाचा एक सुंदर मराठी सिनेमा आला होता. त्यामध्ये नायक असलेला केशव याची सायकल दोन चोर चोरून नेतात. केशव या सायकलीला जिवापेक्षा जास्त जपत असतो कारण त्याला ही सायकल त्याचे आजोबांनी दिली असते. सायकल रूपा मध्ये तो आपल्या आजोबांनाच बघत असतो. सायकल चोरी नंतर अस्वस्थ झालेला केशव आणि ज्यांनी सायकल चोरली त्यांना फिरतांना लोकांनी सांगितलेले केशवचे चांगुलपणाचे किस्से त्यामुळे संकोचित होऊन दोघं चोर सायकल केशवला परत करतात आणि सिनेमा संपतो. हे सिनेमाचं कथानक आहे.


ज्याप्रमाणे सिनेमात केशवसाठी सायकल असते त्याचप्रमाणे प्रत्येकाचे आयुष्यत अशी एक गोष्ट किंवा वस्तू असते जी कधीच पैसे मध्ये किंवा इतर मोजमापा मध्ये मोजता येत नाही. ज्याप्रमाणे मुलींसाठी आईने दिलेली साडी, माझ्या सारखें क्रिकेटप्रेमी साठी पहिली बॅट, एखाद्या खेळाडूने अथक मेहनतीवर कमवलेली देशाची जर्सी या सर्व गोष्टी विकत भेटत नाही. बाहेरून पाहून जरी ह्या गोष्टी बाकी इतर वस्तू प्रमाणे दिसत असल्या तरी त्याबरोबर अनेक आठवणी, किस्से जोडल्या असतात.


मुंबईमध्ये किर्ती कॉलेज समोर असलेला अशोक वडापाव फेमस आहे. तस पाहिलं तर तिथे प्रत्येक अर्धा किमी वर किमान एकतरी वडापावची गाडी दिसेल. पण अशोक वडापाव फक्त वडापाव नसून मेहनत, निराशा, लढाऊपणा ह्या सर्व गोष्टीचा खजाना आहे. वडापाव दुकानाचे मालक अशोक यांनी गरिबीला कंटाळून पहिले छोट्या मोठ्या दुकानांमध्ये काम केलं तरीही खर्च भागांत नसल्याने वडापावची गाडी टाकली. सुरवातीला वडापाव खायला कोणी येत नसत, तेव्हा वडापाव खाणं हलकं समजल जाई. अश्या सर्व कठीण प्रसंगातून अशोक यांनी वडापाव जगवला आणि वाढवला. सध्या वडापाव खाण्यात तरी विषमता दिसून येत नाही. या सर्व गोष्टी त्या वडापावला खास बनवतात.


आज माझं ह्या सर्व बोलण्याचा उद्देश म्हणजे मी आज सायकल विकत घेतली. सायकल तर तशी शाळेतही होती पण जी सायकल हवी होती ती न्हवती. मध्यमवर्गीयांचं हे नेहमीच दुखणं असतं. आज जी सायकल घेतली ती त्याच प्रकारची आहे जी मला लहान असतांना मिळाली न्हवती आणि एक वर्तुळ पूर्ण झालं. कदाचित सायकल हे फक्त निम्मित आहे पण त्याद्वारे मनात अपूर्ण राहिलेली एक इच्छा पूर्ण झाली हेच खर आहे. पैसा कमवून तुम्ही सुखी होत नाही अस म्हणतात कदाचित खरंही असेल पण कधी कधी हाच पैसा तुम्हाला आनंद, समाधान मिळवण्यासाठीही कामात येतो. तसेही जो पैसा उपभोगता येत नाही तो कमवूनही काय फायदा?


तुम्हीही थोडं मनात डोकावून बघा आणि शोधा कुठे मनाच्या कोपऱयात एखादी अपूर्ण इच्छा नाहीना? जर असेल तर नक्कीच पूर्ण करा.

Commenti


Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

  • LinkedIn
  • Facebook

©2021 by Vandan Pawar. Proudly created with Wix.com

bottom of page