एकदा जिम कॅरी म्हणाला होता "श्रीमंत होऊन माणूस आनंदी होतं नाही हे समजण्यासाठी प्रत्येकाने एकदा तरी श्रीमंत बनावे". हेच गणित कधी कधी आपल्या आयुष्यातही अनुभवायला मिळत आणि स्वप्नांच्या बाबतीत नेमकं हेच असत. जो पर्यंत स्वप्न पूर्ण होतं नाही तो पर्यंत ते हवेहवेसे वाटते आणि एकदा
ते पूर्ण झाले की त्यांचं आनंद न उपभोगता आता पुढे काय याचा विचार सुरु होतो. नेमका हाच प्रकार माझ्या एका स्वप्ना बरोबरही होईल पण म्हणून स्वप्न पूर्ण करण्याची धमक किंवा आनंद कमी होतं नाही. इतकं काही सांगितलं तर हे पण सांगून टाकतो की माझं छोटंसं एक स्वप्न म्हणजे विमानात बसायचं. सर्व काही ठीक गेल तर लवकरच स्वप्नपूर्ती होईल.
माझा जन्म झाला आहे नाशिक जिल्ह्यातला. राजकारणी लोकांचे तात्पुरते helipad तर बरेचदा पहिले पण विमानात बसण्याचा किंवा जवळून बघण्याचा मुहूर्त कधी लागला नाही. जेव्हा कधी विमान बघितलं एक तर सिनेमामध्ये किंवा थेट हवेत. विमान हे जरी प्रवासाच साधन असलं तरी नजरेने कधी त्याकडे बघितलंच जात नाही. विमान प्रवास हे प्रवासाबरोबरच मानसन्मानाच्या आकाशात खूप लांब पोहचल आहे.
माझ्या आयष्यात तब्बल 30 वर्ष गेली तरी विमानात बसण्याचा योग आला न्हवता. सुरवातीला सांगितल्या प्रमाणे विमान फ़क्त हवेत दिसलं होतं अजुन तरी जमिनीवर पाहण्याचा योग आला न्हवता पण 4 डिसेंबर 2021 तो दिवस येणार आहे. तेव्हा मी प्रत्यक्ष विमानात बसणार आहे आणि नभातून जमीन कशी दिसते हे पण अनुभवणार आहे. माझा विमान प्रवास तसा खूप मोठा नाही फ़क्त पुणे ते दिल्ली आहे. फ़क्त फरक हाच आहे की आज माझी एक लहानपनापासूनची इच्छा पूर्ण होणार आहे. मागील 2 महिने म्हणजे जेव्हा पासून विमानाचे तिकीट आरक्षित केलं तेव्हापासून रोज एकदा तरी धडधड होते. बादशहा सिनेमामध्ये शाहरुख किंवा त्याच्या मित्र मंडळीची जशी धावपळ होते ती होऊ नये म्हणून youtube ची मदत घेऊन मूलभूत विमानातले व्यवहार शिकून घेतले. बाकी तिकडे पोहचूनच किती शिकलो आणि किती शिकायचं राहिल समजेल.
कधी कधी विचार मलेशियाच 370 विमान चीनला जाताना अचानक रडार वरून गायब झालं आणि नंतर भेटलंच नाही या प्रसंगाचीही आठवण होते पण इतकं काही आपल्या बरोबर होणार नाही यांची खात्री बाळगून देवाचं नाव घेतो आणि पहिला विमान प्रवास सुखरूप झाला तर पुढच्या लेखातून नक्की सांगेल.
Kommentare