top of page

धिंडवडे

लहानपणी सर्व मुलांना सांगितलं जात रोजचा अभ्यास रोज पुर्ण करा नाहीतर परिक्षेआधी अभ्यासची सुरवात केली की फायदा तर होत नाही उलट ताणच वाढतो..


हेच सध्या भारताचे आरोग्य विभागाचे वाट्याला आले आहे.


भारताने वार्षिक जीडीपीमधे आरोग्य विभागावर १% व जास्तीत जास्त १.२८% इतकाच खर्च गेल्या सहा व सात वर्षात केला आहे. भारतापेक्षा मालदिव, थाईलैंड हे देश आरोग्य विभागावर जास्त खर्च करतात. युरोपिअन देशांच बोलयचं तर 4-5 पटीने जास्त पैसा खर्च होतो. याआधी यावर कोणीच गंभीरपणे विचार केला नाही. यामधे सर्वच सरकार आणि अगदी लोकांचाही समवेश आहे. अगदी बोलायचं म्हंटल तर किती लोक आपले मिळकतीचे काही रक्कम आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी अथवा आरोग्य विमा काढून स्वःताला सुरक्षित बनविण्यासाठी खर्च करत होते. पण मागचे 3-4 महिने पासुन कोविडमुळे देशाची जी वाताहत झाली ते पाहणं अवघड झाल आहे. सर्वोच न्यायालयाला मधे पडून समिती नेमण्याची पाळी आली आहे. ऑक्सिजनचे अभावी शेकडो लोकांचे मृत्यू झाले. आपत्कालीन व्यवस्था हाताळण्याचं प्रशिक्षण नसलेने हॉस्पिटल जळुन खाक होत आहे. उत्तर भारतमध्ये मधे मरण पावलेची प्रेते नदी मधे फेकली जात आहे. रेमडेसिव्हिर आणि ऑक्सिजनचा काळा बाजार अगदी परमोच बिन्दूला जावुन भिडला आहे. काही ठिकाणी तर बनावट रेमडेसिव्हिरची विक्री चालू असल्यची बातमी आली आहे. आत्मनिर्भर बनण्यासाठी नारा देणारे आपण वैद्यकीय यंत्र आणि तंत्रण्यानासाठी परदेशी देशावर अवलंबुन आहे


हे सर्वांचं प्रमुख कारण म्हणजे आपण वेळोवेळी आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष केल. किती सरकारनी सरकारी हॉस्पिटलला अत्यधुनिक बनवण्यासाठी योजना आखुन पूर्ण केली. अजुनही आपण आधुनिक वैद्यकीय तंत्रण्यानासाठी परदेशी देशवर अवलंबून आहे.


कदचित हेच वेळ आहे सर्वानी एकत्र बसुन यावर काम करायला हव आणि बोध घेवा. सरकारने ठोस आराखडा आखून सरकारी हॉस्पिटल मध्ये बदल घडवून आणणे अपेक्षित आहे, यामध्ये खासगी क्षेत्रातील उद्योग समूहांची मदत घेवी. समाजामध्ये विज्ञानाचा प्रसार करावा, अजूनही काही भागांमध्ये खोटे उपचारांना लोक बळी पडतात. सरकारने लोकांमधे आरोग्य विमा घेणे साठी जनजागृती करावी. अजुनही बरेच लोक आरोग्य विम्याला महत्व देत नाही. त्यामधे बदल होना गरजेचे आहे.


प्रत्येक संकट काही तरी शिकवून जाते आपलेलाही यातुन खुप काही शिकुन अणि दूरदृष्टी ठेवून त्यावर काम करने गरजेच बनल आहे. नाहीतर प्रत्येकवेळी नवी महामारी येऊन आपले धिंडवडे काढले शिवाय रहाणार नाही.
25 views0 comments

Recent Posts

See All

Commenti


Post: Blog2_Post
bottom of page