top of page

ऋषिकेश, उत्तराखंड - (भाग तिसरा)

पहिला दुसरा :- https://www.vandanpawar.com/post/ऋषिकेश-उत्तराखंड-भाग-दुसरा


ऋषिकेश मध्ये घालवलेल्या पहिल्या दोन दिवसात मी जेव्हाही गंगा घाटावर जावून बसलो तेव्हा मला शांतता लाभली. त्यामुळे यापुढे मी जोपर्यंत ऋषिकेशमध्ये असेल तोपर्यंत संध्यकाळी गंगाघाटावर जाणार होतो हे ठरवले.


माझे उत्तराखंड दर्शन शेवटच्या टप्प्यात आले होते. डेहराडून, मसूरी आणि नंतर ऋषिकेश मध्ये येवून तब्बल पाच दिवस झाले होते. तरी अजुन 2 दिवसाचा मुक्काम बाकी होता.

ऋषिकेशला येण्यापूर्वी आखलेल्या प्लॅन प्रमाणे मी आज म्हणजे ऋषिकेशच्या दोन दिवसाच्या मुक्कामानंतर हरिद्वारला निघणार होतो. हरिद्वारला दोन दिवस राहून डेहराडून वरून पुण्याला जाण्याची तयारी होती. एकंदरीत ऋषिकेश पाहून जाणवलं 2 दिवसात ऋषिकेश मन भरून बघता येणार नाही. त्यामुळे हरिद्वारला जाणे मी रद्द करून पुढील दोन अडीच दिवस ऋषिकेशमध्ये राहणार होतो. त्यामुळे मला ऋषिकेश मध्ये 5 दिवस भेटणार होते जे बघण्यासाठी भरपूर आहे.


यामध्ये एक अडचण म्हणजे long weekend असल्याने इथे सर्व ठिकाणे हॉउसफ़ुल्ल झालेली. महाराष्ट्रमधेही जसे कोकण किंवा गोवा वर्ष अखेरीस अगदी लोकांनी जसे तुडुंब भरून वाहतात तसाच प्रकार इथेही आहे. मी ऐनवेळी मुक्काम वाढवल्याने मला पहिले दोन दिवस राहण्याची सोय करणे भाग होते. सध्या राहत असलेल्या GoStop लक्ष्मण झुला जवळच मला एक हॉस्टेलमध्ये मला शेवटचा बेड भेटला आणि मुक्कामाचा विषय मिटला.


नवीन हॉस्टेलच्या ठिकाणी राहण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण करून मी "Beatles Ashram" पहायला गेलो. खरंतर या आश्रमाचे खरे नाव चौरासी कुटिया आहे. इथे महर्षी महेश योगी Transcendental Meditation technique शिकवायचे आणि यासाठी जगभरातून अनेक लोक इथे येयचे. खरंतर हे चौरासी कुटियाला प्रसिद्धी लाभली १९६८ मध्ये जेव्हा जगप्रसिद्ध इंग्लिश बँड "Beatles" ने इथे काही दिवस येवून मेडिटेशन शिकले. तेव्हा पासून हे चौरासी कुटिया आश्रम "The Beatles Ashram" म्हणूनही ओळखले जाते. गंगा घाटावर असलेल्या या आश्रमात ठिकठिकाणी मेडिटेशन साठी छोटया गुहा बनवलेल्या आहे. सध्या हे आश्रम वापरात नसल्याने इथला बहुतेक ढाचा मोडकळीस आलेला आहे. तिथेच असलेल्या एका मोठया कक्षात Beatles band ची चित्रे रंगवलेली आहेत अर्थात तिथे फोटो घेण्यासाठी गर्दी अपेक्षेप्रमाणे होतीच. तो कक्ष सोडून इतर ठिकाणी महर्षी महेश योगी आणि Transcendental Meditation बद्दल माहिती होती बाकी इतर काही खास पाहण्यासारखे न्हवते म्हणून मी तिथून परत आलो.

ऋषिकेश बद्दल अजुन एक खास गोष्ट नमूद करावी वाटते ते म्हणजे इथले खानपान. इथे खानपाण्यात तुम्हाला विविधता भेटेल. परदेशी पर्यटकांचा वावर इथे भरपूर असल्याने इथल्या हॉटेल्स मधल्या मेनूमध्ये ही त्याचा प्रभाव जाणवतो.


Beatles Ashram पाहून झाल्यावर अजुनही माझ्याकडे 1 पूर्ण दिवस शिल्लक होता. त्यादिवशी मी नवीन काहीतरी बघण्यापेक्षा River Rafting करण्यासाठी परत गेलो. तीन दिवसापूर्वी राफ्टिंगचा अनुभव विलक्षण होता त्यामुळे अजुन एकदा राफ्टिंग करून अजुन एकदा हौस पूर्ण केली. दुसऱ्या वेळेला ही राफ्टिंगला तेवढीच मज्जा आली जेवढी पहिल्यांदा आलेली.


शेवटच्या दिवशी मला दुपारी 3 वाजता डेहराडून वरून via दिल्ली पुण्याला जायचं होतं. सकाळीच गंगामातेचे दर्शन घेवून ऋषिकेश वरून डेहराडूनला निघालो. 8 दिवसाच्या प्रवासात आता थकवा जाणवत होता आणि बॅकपॅक गरजेपेक्षा जड झालेली. तरी सर्व आवरत जॉली ग्रॅण्ट ह्या डेहराडूनच्या एअरपोर्ट वर पोहचलो. माझं विमान अजुन येयला अजुन तरी वेळ होता त्यामुळे एअरपोर्ट वरच वेळ घालवन होतं. डेहराडूनचे विमानतळ पुण्यापेक्षा बरेच छोटे होते. ८ दिवसापूर्वी दिल्ली वरून इथेच मी आलेलो तेव्हा एअरपोर्ट कडे मी जास्त लक्ष न देता थेट सामान उचलून मसूरीला गेलेलो. तेव्हाच उत्साह काही तरी वेगळाच होता. त्याउलट आज जातांना थोडं वाईटही वाटत होतं आणि परत घरी जाणार म्हणून आनंदही होता.


दिल्लीला जाणार माझं विमान आलं आणि मी बसलो. जस जस विमान runway ला जावू लागले तशी तशी माझी उत्तराखंड ट्रिप संपत होती. शेवटी विमान हवेत उडालं आणि मी वरतून उत्तराखंड बघत राहिलो. उत्तराखंड ट्रिप बद्दल एक खास गोष्ट म्हणजे इथे मी पहिल्यांदाच आलो असल्याने सर्व काही नवीनच होते. यामध्ये ब्रिटिशांची छाप असलेली मसूरी, Landour town, जागतिक योगा कॅपिटल आणि गंगा नदीने पावन झालेले ऋषिकेश, गंगा घाट आणि रिव्हर राफ्टिंग नक्कीच माझ्या आठवणीत राहतील.


तुम्हीही उत्तराखंड नक्की भेट द्या आणि उत्तराखंडला देवभूमी का म्हणतात याचा अनुभव घ्या.

13 views0 comments

Recent Posts

See All
Post: Blog2_Post
bottom of page